best news portal development company in india

“कायद्याचा बालेकिल्ला दाखवत भोंदू बाबा अशोक खरात कोठडीत; महिलांच्या शोषणाच्या तक्रारींनी उघड केला काळा चेहरा!”

SHARE:



प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
नाशिक:नाशिक शहरात कायद्याचा धाक प्रस्थापित करत पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस कारवाई करत तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याला अटक केली आहे. गल्लोगल्ली स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या तथाकथित भाईंना याआधीच पोलीस आयुक्तांनी कायद्याचा बालेकिल्ला दाखवला होता. आता हाच कायद्याचा बालेकिल्ला थेट हाय-प्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात यालाही दाखवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असून त्याला चालणे देखील कठीण झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ‘कायद्याचा बालेकिल्ला’ असे मोठमोठ्याने बोलणारा खरात अखेर पोलिसांच्या कारवाईसमोर कोसळला आणि त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्यात आली.
या प्रकरणात गंभीर वळण तेव्हा आले, जेव्हा दोन महिलांनी खरात विरोधात शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींनंतर त्याच्याविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अटकेनंतर अशोक खरात बोलू लागल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, या भोंदूगिरीच्या जाळ्यात आणखी कोण-कोण अडकले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. भोंदूगिरी, शोषण आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

                Aone News Maharashtra
             सत्यासाठी लढा… अन्यायाविरुद्ध आवाज…

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई