प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
पांगरी बुद्रुक (ता. सिन्नर, जि. नाशिक) — वहिवाटीचा हक्काचा रस्ता बंद झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचे उपोषण आज सातव्या दिवशीही सुरूच असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकरी आक्रमक भूमिकेत आले आहेत.
गट क्रमांक 158, 159, 160 साठी अत्यावश्यक असलेला वहिवाटी रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनी वापरात आणलेला तात्पुरता पर्यायी मार्गही बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची शेती अक्षरशः अडचणीत सापडली आहे.
गहू काढणी ठप्प,ऊस वाहतूक पूर्णपणे बंद,शेतीमाल शेतातच अडकला आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला असून, शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत — एकीकडे रस्ता बंद, तर दुसरीकडे निसर्गाचा कहर आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे धाव घेतली, निवेदने दिली, विनंत्या केल्या; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तीव्र नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली.
उपोषणादरम्यान एक शेतकरी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी ही घटना आंदोलनाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधोरेखित करते.
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वहिवाटी रस्ता खुला केला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
वहिवाटी रस्ता तात्काळ खुला करावा,शेतीसाठी आवश्यक वाहतुकीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा
सध्या पांगरी बुद्रुकमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





