best news portal development company in india

कोळपेवाडीत महेश्वर महाराज यात्रेचा भव्य शुभारंभ; धार्मिक, सांस्कृतिक आणि लोककलांचा त्रिवेणी संगम!

SHARE:


प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी

कोपरगाव :अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महेश्वर महाराज यात्रेला आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारी ही यात्रा परिसरातील सर्वात मोठ्या समाधी यात्रांपैकी एक मानली जाते.
यात्रेनिमित्त संपूर्ण गाव सज्ज झाले असून बाजारतळ परिसरात राहाट पाळणे, ‘मौत का कुहा’सारखे खेळ, तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. गावात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून रस्त्याच्या दुतर्फा आणि मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यात्रा कमिटीने यंदा भव्य आणि शिस्तबद्ध नियोजन केले असून संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून अहिल्याबाई जलाशय येथे सुमारे ५० लाख रुपये खर्चून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, ज्यामुळे यात्रेच्या व्यवस्थापनाला अधिक बळ मिळाले आहे.
या यात्रेतील प्रमुख कार्यक्रम हे गुरुवार पहाटे महेश्वर महाराजांच्या मूर्तीला पवित्र जलाभिषेक,साई सूर वंदन व पाडवा पहाट कार्यक्रम,डॉक्टर असोसिएशन, ग्रामस्थ व निर्मल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटतर्फे रक्तदान शिबिर,सकाळी १० वाजता गोदावरी जल कावड शोभायात्रा,सायंकाळी ५ वाजता भगत म्हातारबा कोळपे यांच्या हस्ते पारंपरिक गाड्यांचा कार्यक्रम,सायंकाळी भव्य रथ मिरवणूक व बँड जुगलबंदी,रात्री मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा असे होत असतात.
तसेच शुक्रवारी स्थानिक लोककलावंतांचे सादरीकरण व बैलगाडा शर्यत होणार असून शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि लोककलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती स्थानिक नागरिकाकडून मिळाली आहे.
“या भव्य यात्रेत सहभागी होऊन महेश्वर महाराजांचे दर्शन घ्यावे आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई