प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
नाशिक:येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या भव्य आणि सुरक्षित आयोजनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात कुंभमेळा नियोजनाच्या शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळा २०२७ साठी ₹२२ हजार १८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि घाट विकास यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंजूर निधीमध्ये पहिल्या टप्प्यातील ₹५,१४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील ₹१७,०४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, कुंभमेळ्याला देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधा अत्यंत दर्जेदार आणि व्यवस्थित असणे आवश्यक आहे. भाविकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendrasinhraje Bhosale, परिवहन मंत्री Pratap Sarnaik तसेच आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, सरोज अहिरे, पंकज भुजबळ, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले आणि नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या.
नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि भव्य स्वरूपात पार पडावा यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाकडून व्यापक नियोजन सुरू असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





