best news portal development company in india

शिंदे टोलनाक्यावर हिरकणी बसला भीषण आग; क्षणात बस जळून खाक – चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली…

SHARE:

      संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड, उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,
       जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क:     -9422952513/9637100608 सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्यूज महाराष्ट्र” या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा,कमेंट करा.

“हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि मत कमेंटमध्ये नक्की द्या”


नाशिक :आज सायंकाळच्या सुमारास शिंदे टोलनाका परिसरात सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या नाशिक डेपोच्या हिरकणी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत खाली उतरवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून नाशिककडे येत असलेली नाशिक डेपोची एमएच 06 बीडब्ल्यू 1235 क्रमांकाची हिरकणी बस सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिंदे टोलनाका ओलांडून नाशिकच्या दिशेने जात होती. यावेळी बसचे चालक विलास रखोचोले आणि वाहक संदीप मोरे यांच्या लक्षात आले की बसच्या इंजिनमधून धूर निघत आहे.

ही बाब लक्षात येताच चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना घाईघाईने खाली उतरवले. प्रवासी खाली उतरवल्यानंतर काही क्षणातच बसला आग लागली आणि आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली.

दरम्यान, टोल नाका कर्मचारी विकलचंद पूर्वी यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नाशिक रोड अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास काळे, लक्ष्मीकांत बेंद्रे, यश बिडवे आणि हरिओम खालकर यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत नागरिकांना मदत केली.

सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई