best news portal development company in india

सिन्नर नगरपरिषदेत राजकीय वाद तापला! मंजूर विकासकामांना स्थगितीच्या निषेधार्थ आज भाजप-शिवसेनेचा मोर्चा…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

दि. 13 मार्च 2026
सिन्नर:नगरपरिषदेत मंजूर झालेल्या विविध विकासकामांना स्थगिती देण्यात आल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात शुक्रवारी (13 मार्च) सकाळी सिन्नरमध्ये जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अलीकडेच सिन्नर नगरपरिषदेत विकासकामांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या कामांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. मात्र सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी मुद्दामहून या कामांमध्ये अडथळे निर्माण करत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सरवार यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय चुकीचा असून यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे.
सध्या सिन्नर नगरपरिषदेत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची सत्ता आहे. या सत्तेनंतर नगरपरिषदेत विरोधी पक्षातील नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
स्थगिती दिल्याचा आरोप असलेली प्रमुख कामे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चौक सुशोभीकरण व महाराजांचे प्रास्ताविक शिल्प उभारणी.आंबेडकर नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार व अभ्यासिका उभारणी.सिन्नर उपनगरातील रस्ते, नाले-गटारी व इतर मूलभूत सुविधा विकासाची कामे अशी आहेत.
या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी सिन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नगरपरिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात स्थानिक नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांना केवळ राजकीय हेतूने अडविण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शहरातील विकासकामांना विलंब होत असून नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या आरोपांवर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र या मुद्द्यावरून सिन्नर नगरपरिषदेत राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई