best news portal development company in india

सिन्नरच्या सौ. वैशाली अनवट यांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ — दिव्यांग सेवा व समाजकार्याबद्दल देशपातळीवर सन्मान

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

दि. 12 मार्च 2026 :
सिन्नर:येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली दत्तात्रय अनवट यांना दिव्यांग सेवा, समाजसेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेतर्फे ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. या सन्मानामुळे सिन्नर शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सौ. वैशाली अनवट या प्रहार महिला संघटनेच्या सिन्नरमधील सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. दिव्यांग सेवा, समाजहिताचे विविध उपक्रम आणि महिलांच्या समस्यांवर आवाज उठविणे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घरचा प्रपंच सांभाळत समाजसेवेच्या कार्यात मोठ्या जिद्दीने आणि धाडसाने त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
महिला असूनही समाजातील अनेक प्रश्नांवर पुढाकार घेऊन काम करताना त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. दिव्यांग बांधवांना मदत, गरजू कुटुंबांना आधार आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्या स्थानिक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महिला आघाडीतर्फे त्यांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. सिन्नरच्या भूमिपुत्री म्हणून हा सन्मान मिळाल्यामुळे स्थानिक महिलांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रहार संघटनेचे सिन्नर अध्यक्ष कैलास दातीर, संदीप आव्हाड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सौ. वैशाली अनवट यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सौ. वैशाली अनवट यांना मिळालेला हा सन्मान सिन्नरच्या महिला शक्तीचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर महिलांनाही समाजकार्यात पुढे येण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई