प्रतिनिधी:किसन सोनवणे,कोळपेवाडी
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील देडे मढी येथे ब्रह्मकुमारी संस्था तर्फे बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेचा भव्य व भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
या सोहळ्याला माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, पाटबंधारे मंत्री तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही कार्यक्रमास भेट देत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात कोपरगाव तालुक्याच्या संचालिका सरलादेवी, संभाजीनगर येथील आरोग्य सल्लागार देवेंद्र भाऊ गवारे, ब्रह्मकुमारी संस्थेचे साधक किसनराव सोनवणे, बाळासाहेब घेगडमल, बाबासाहेब बंदरे, इंद्रभान बंदरे, संदीप भाई भोसले, मढी येथील संचालिका शितल दीदी, कोपरगावच्या संचालिका चैताली दीदी तसेच आरोग्य सल्लागार सोनी सेठ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थापनेमागील आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. समाजात नैतिक मूल्यांची जपणूक, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण आणि युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी ब्रह्मकुमारी संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थापना सोहळ्यानंतर सामूहिक प्रार्थना, ध्यानधारणा व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे देडे मढी परिसरात आध्यात्मिक उर्जेची अनुभूती निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्रह्मकुमारी संस्थेच्या सर्व साधक-सेविकांनी परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुढील काळातही अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





