best news portal development company in india

“देशासाठी १४ वर्षांची सेवा… अखेरचा सलाम!”
भुत्याणेच्या भूमीपुत्र जवान संदिप महाले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना…

SHARE:

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी”एवन न्यूज महाराष्ट्र” या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा,कमेंट करा.
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: -9422952513/9637100608
“हा व्हिडिओ पूर्ण वाचा आणि मत कमेंटमध्ये नक्की द्या”

उपसंपादक:ज्ञानेश्वर सांगळे, नाशिक

दि. २२ फेब्रु. २०२६
Indian Navy मध्ये कार्यरत असलेले चांदवड तालुक्यातील भुत्याणे गावचे सुपुत्र जवान संदिप जगन्नाथ महाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशसेवेचे व्रत जपणाऱ्या या वीर जवानाच्या आकस्मिक निधनाने भुत्याणे गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. रविवारी (दि. २२) त्यांच्या पार्थिवावर भुत्याणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर शिक्षण पूर्ण करून संदिप महाले यांनी सन २०१२ मध्ये भारतीय नौदलात भरती होत देशसेवेचे स्वप्न साकार केले होते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील कर्ते पुरुष म्हणून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. गेल्या १४ वर्षांच्या सेवेत त्यांनी INS Ashwini, INS Shivaji, INS Kalinga आणि INS Kalyani अशा महत्त्वाच्या नौदल तळांवर सेवा बजावली. सध्या ते Visakhapatnam येथे एलटी पदावर कार्यरत होते.

रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव विशाखापट्टणमहून मुंबई-नाशिक मार्गे मालसाणे येथे आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनातून संपूर्ण गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावकऱ्यांनी “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

पार्थिव घरी आणताच पत्नी अर्चना यांच्यासह कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भुत्याणे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ किरण यांनी अग्नीडाग देत अंत्यविधी पार पाडला.

यावेळी शासकीय अधिकारी, नौदलातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. लष्करी व पोलीस दलातील जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली. देशासाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाला अखेरचा सलाम देण्यासाठी परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जवान संदिप महाले यांच्या पश्चात आई शिला, वडील जगन्नाथ, पत्नी अर्चना, एक लहान मुलगी, भाऊ किरण तसेच आजी-आजोबा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी “वीर जवान अमर रहे”च्या घोषणांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

नाना सांगळे
एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई