best news portal development company in india

  महामार्ग ठप्प करून ग्रामस्थांचा उद्रेक!
मधुकर गायकर यांच्या कथित बेकायदेशीर खरेदीविरोधात विंचूर येथे तुफान रस्ता रोको….

SHARE:

प्रतिनिधी विंचूर
विंचूर:नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विंचूर येथे आज ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून, कथित बेकायदेशीर जमीन खरेदीच्या निषेधार्थ जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जवळपास एक तास महामार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या गट क्रमांक ६२७ मधील जमीन श्री. मधुकर रामचंद्र गायकर (निमगाव) यांनी कथितरित्या खरेदी केली आहे. ही खरेदी पूर्णतः बेकायदेशीर असून सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर, विष्णूनगर परिसरातील गावाची सार्वजनिक पाण्याची विहीर तसेच शेततळे देखील बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकारामुळे गावाच्या मूलभूत सुविधांवर गदा येत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत,
संबंधित जमीन खरेदी तात्काळ रद्द करावी,
खरेदीदारासह जबाबदार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,
सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करावे,
अशा ठाम मागण्या केल्या.
परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
या कथित बेकायदेशीर व्यवहाराची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Aone News Maharashtra प्रतिनिधी विचुर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई