best news portal development company in india

पर्यटनस्थळ हरिहर किल्ल्याकडे जाणारा रस्ता मृत्यूच्या दाढेत!
सापगाव फाटा–कळमुस्ते–हर्षवाडी रस्त्याची दुरवस्था; कुंभमेळ्यापूर्वी तातडीच्या दुरुस्तीची जोरदार मागणी

SHARE:



त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी

नाशिक :जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेला ऐतिहासिक आणि साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हरिहर गड सध्या रस्त्याच्या भीषण दुरवस्थेमुळे चर्चेत आला आहे. सापगाव फाटा ते कळमुस्ते–हर्षवाडी या हरिहर किल्ल्याकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, हा रस्ता वाहनचालक, पर्यटक, ट्रेकर्स तसेच स्थानिक आदिवासी नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
हरिहर गडाच्या पायथ्याशी असलेले हर्षवाडी हे छोटे आदिवासी खेडे असून बाजूलाच कळमुस्ते गाव आहे. या परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच पर्यटक याच रस्त्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, उखडलेला डांबराचा थर, चिखल आणि दगड पसरलेले असल्याने वाहन चालवणे अक्षरशः जीवघेणे बनले आहे.
हरिहर गड हा महाराष्ट्रातील अत्यंत अवघड आणि प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळांपैकी एक आहे. दर आठवड्याला हजारोंच्या संख्येने पर्यटक व ट्रेकर्स येथे येतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अनेक जण अर्ध्यातच परत फिरत आहेत, तर काहींना वाहनांचे नुकसान व शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्या काळात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. यातील अनेक भाविक त्र्यंबकेश्वर दर्शनासोबत हरिहर गडासही भेट देऊ शकतात. मात्र सध्याची रस्त्याची अवस्था पाहता प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर रस्त्याच्या कामाचा दोष दायित्व कालावधी संपलेला आहे किंवा रस्ता तयार होऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला असेल, तर हा रस्ता नव्याने मंजूर करून तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात मा. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून, रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती अथवा संपूर्ण नूतनीकरणाचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यटन, स्थानिक आदिवासींची दळणवळणाची गरज आणि येणारा कुंभमेळा लक्षात घेता, हा रस्ता केवळ डांबरीकरणाचा प्रश्न नसून नाशिक जिल्ह्याच्या पर्यटन प्रतिमेशी निगडित गंभीर विषय आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे तातडीने लक्ष देतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र”

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई