best news portal development company in india

सुरेगावात बिबट्याची दहशत! ऊस तोडणी मजुरावर अचानक हल्ला, गंभीर जखमी

SHARE:

प्रतिनिधी : निवृत्ती पवार,कोळपेवाडी

कोपरगाव:तालुक्यातील सुरेगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकरी व ऊस तोडणी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी ऊस तोडणी सुरू असताना शेतकरी बाळासाहेब भास्कर वाबळे यांच्या शेतात ऊस तोडणी मजूर नेहमीचंद हरी जाधव यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात बिबट्याने मजुराच्या हातावर व डोक्यावर झडप घालत गंभीर जखमा केल्या असून विशेषतः हाताला मोठी दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेत परिसरात एकच आरडाओरडा झाला आणि मजुरांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.
घटनेनंतर सहकारी मजुरांनी तात्काळ जखमी मजुराला उपचारासाठी हलवले. शेतकरी प्रशांत वाबळे व शुभम मंडलिक यांनी तत्काळ मदत करत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमी मजुराला सरकारी दवाखाना, कोपरगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या शेतामध्ये दोन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या बिबट्याची चाहूल लागताच आवाज करून त्याला हाकलण्यात आले होते; मात्र दुसऱ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ऊस तोडणी कामगारावर हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर सुरेगाव व वेळापूर परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, या भागात तात्काळ बिबट्याचा पिंजरा लावावा अशी जोरदार मागणी शेतकरी प्रशांत वाबळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता, या भागात तातडीने पिंजरे, गस्त व जनजागृती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई