सिन्नर | प्रतिनिधी – भाऊसाहेब हंडोरे
सिन्नर: तालुक्यातील पूर्व भागात अलीकडच्या काळात मंदिरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वावी, शहा, कारवाडी पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कारवाडी (ता. सिन्नर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रावर चोरट्यांनी पुन्हा एकदा डल्ला मारल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
दि. ३० जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राचे कुलूप तोडून मंदिरातील दाबपेटी, चांदीचे ताटे, पितळी समई, तसेच शेजारी असलेल्या म्हसोबा मंदिरातील घंटा अशा मौल्यवान पूजेच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. चोरीची ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
विशेष बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही याच स्वामी समर्थ केंद्रात चोरीची घटना घडली होती. त्यावेळी पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदी व पितळेच्या मौल्यवान वस्तू, तसेच महागडा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. मात्र त्या घटनेतील चोरट्यांचा ठोस बंदोबस्त न झाल्यानेच पुन्हा अशी घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थ व स्वामी समर्थ भक्तांकडून करण्यात येत आहे.
या सततच्या चोरीच्या घटनांमुळे स्वामी समर्थ भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, चोरट्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच परिसरातील मंदिरांच्या सुरक्षिततेसाठी रात्री गस्त वाढवणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले असून कोणालाही संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे –
📞 02551-283433 | 9359095274 | 9422990273

या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून, मात्र तपासाबाबत हालगर्जीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. आता पोलिस प्रशासन या गंभीर प्रकरणात काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





