कोपरगाव | प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोपरगाव:तहसील कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीच्या साखळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून महसूल सहाय्यक अंजली पवार यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कोपरगाव महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तहसील कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली. संबंधित कामासाठी आलेल्या तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक अंजली पवार ACBच्या जाळ्यात अडकल्या. कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
अहिल्यानगर लाचलुचपत विभागाच्या निरीक्षक छाया देवरे यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हा नोंदविण्यास अद्याप काही तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
कोपरगाव तालुक्यातील शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. महसूल कार्यालयाबाबत तर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामांसाठी लाच मागितली जात असल्याचे आरोप वारंवार होत आहेत.
राज्यात भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका जाहीर करूनही कोपरगाव तहसील कार्यालयाने त्या घोषणांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी ‘भ्रष्टाचार बंद’चे खणखणीत धोरण जाहीर केले होते. मात्र, कोपरगाव तहसीलमध्ये मात्र भ्रष्टाचाराची गंगा अजूनही वाहत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांत कोपरगाव महसूल कार्यालयातील भ्रष्टाचारावरून अनेकदा गाजावाजा झाला आहे. मागील उन्हाळ्यात वाढलेल्या तक्रारीनंतर आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेऊन कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली होती.
चार वर्षांपूर्वी येथील तहसीलदार वाळू प्रकरणात लाच घेताना रंगेहात पकडले गेले होते. त्यानंतर नाटेगाव, येसगाव येथील तलाठी, अव्वल कारकून अशा जवळपास अर्धा डझन अधिकारी व कर्मचारी यांना ACBने अटक केली होती. तरीही भ्रष्टाचार आटोक्यात येताना दिसत नाही.
अटक करण्यात आलेल्या महसूल सहाय्यक अंजली पवार या मूळच्या साक्री तालुका, जिल्हा धुळे येथील असून त्या दोन वर्षांपूर्वी संगणमेर तहसील येथून बदली होऊन कोपरगाव तहसीलमध्ये कार्यरत झाल्या होत्या.
या ताज्या कारवाईमुळे कोपरगाव तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासन आता पुढे कोणती कठोर पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Aone News Maharashtra सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसह हा मुद्दा सातत्याने उचलून धरणार आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसह हा मुद्दा सातत्याने उचलून धरणार आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





