छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
शासनाच्या “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” अंतर्गत शेतकऱ्यांच्या कामासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. पैठण तालुक्यात सौर कृषी पंपासाठी सर्वे करून देण्याच्या मोबदल्यात १,५०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा वीज तंत्रज्ञ शुभम भारत रोकडे (वय २५) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार (पुरुष, वय २९) यांची पैठण तालुक्यातील कारकीन शिवारात गट क्रमांक १६० मध्ये शेतजमीन आहे. सदर जमिनीसाठी शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यानंतर जमिनीचा सर्वे करणे आवश्यक होते. हा सर्वे करून देण्यासाठी आरोपी शुभम रोकडे याने तक्रारदाराकडे २,००० रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने २,००० रुपयांच्या मागणीची पुनरावृत्ती करत तडजोडीअंती १,५०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर त्याच दिवशी ढोरकिन–कचनेर रोडवरील राधाकृष्ण लॉन्ससमोर शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे आरोपीने तक्रारदाराकडून १,५०० रुपये लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
आरोपीच्या अंगझडतीमध्ये १,५०० रुपयांची लाच रक्कम व Vivo Y-15 मोबाईल फोन मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. सदर प्रकरणी MIDC पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचे सक्षम प्राधिकारी मा. अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, छत्रपती संभाजीनगर हे आहेत.
ही सापळा कारवाई श्री. राजू बी. नागलोत, पोलीस निरीक्षक (ACB) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास अधिकारी म्हणून वाल्मीक कोरे, पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत.
सदर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, तसेच उपअधीक्षक राजू तळेकर यांनी मार्गदर्शन केले. सापळा पथकात पोह. साईनाथ तोडकर, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे व सी.एन. बागुल यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने (किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने) कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराबाबत तक्रारीसाठी संपर्क:
📞 टोल फ्री क्रमांक : 1064
📲 व्हॉट्सॲप : 7720891064
📞 पोलीस अधीक्षक, ACB छत्रपती संभाजीनगर : 9011092777
संपादक : अरुण गायकवाड
Aone News Maharashtra | सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी– 9422952513
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





