सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी – Aone News Maharashtra
दि. 29 जानेवारी 2026
प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर: येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे वरिष्ठ नेते व माजी कृषिमंत्री आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षातील नेतृत्वाबाबत मोठे विधान केले आहे.
अजित पवार हाच आमचा पक्ष असून, पक्षाचे नेतृत्व करणारा दुसरा कोणीही नसून अजित पवार कुटुंबातीलच व्यक्ती उपमुख्यमंत्रीपदी असावी, यासाठी सुमित्रा (वहिनी) पवार यांचेच नाव निश्चित असल्याचा ठाम विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, “आम्ही सर्व 41 आमदार अजित पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम करतो. पक्षातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा अजित दादांच्या विचारातूनच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या विचारांची उणीव भरून काढण्यासाठी कुटुंबातीलच व्यक्ती नेतृत्व करावी, हीच आमची भूमिका आहे.”
या संदर्भात माहिती देताना कोकाटे यांनी सांगितले की, “मी स्वतः सर्व आमदारांशी फोनवर व प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे. सर्वांचीच भूमिका स्पष्ट असून नेतृत्वाबाबत कोणताही दुसरा मुद्दा किंवा चर्चा होण्याचा प्रश्नच नाही. सुमित्रा पवार यांच्याशिवाय दुसरे नाव पुढे येणार नाही, हे सर्वांनाच माहीत आहे.
शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कोकाटे म्हणाले,
“तो पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. योग्य वेळी सुमित्रा वहिनी जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्व आमदारांना मान्य असेल. याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.”
कोकाटे पुढे म्हणाले, “आजची परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. अजून आम्ही या दुःखातून पूर्णपणे बाहेर पडलो नाही. अशा वेळी पवार कुटुंबाची अवस्था काय असेल, याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे सध्या राजकीय विषयांवर त्यांच्याशी चर्चा करणे उचित नाही. मात्र योग्य वेळी बैठक होऊन उपमुख्यमंत्रीपदासाठी सुमित्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव आम्ही स्वतःहून मांडणार आहोत.”
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली असून, सुमित्रा पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार कुटुंबाकडूनही याला सकारात्मक होकार मिळाल्याचे समजते. त्यामुळे उद्या मुंबईत उपमुख्यमंत्रीपदासाठी सुमित्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी दिलेली माहिती अधिकृत मानली जात आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे भावूक झाले. ते म्हणाले,
“आमचा तारणहार हरपला आहे. न मागता देणारा, आमचा हक्काचा माणूस आम्ही गमावला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून अजूनही विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
— Aone News Maharashtra —
सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





