best news portal development company in india

वन विभागाची ‘सर्जिकल स्ट्राइक’! माहेगाव देशमुख परिसरात तीन दिवसांत दोन बिबटे जेरबंद, नागरिकांना मोठा दिलासा…

SHARE:

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अखेर या दहशतीला मोठा आळा बसला आहे. अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत सलग दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.
सुरेश भगुरे यांच्या शेताजवळ वन विभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास दुसरा बिबट्या अडकला. यापूर्वी २७ जाने.२०२६ रोजी याच परिसरात मादी बिबट्याला अत्यंत नियोजनबद्ध व सुरक्षित ‘रेखीव ऑपरेशन’द्वारे जेरबंद करण्यात आले होते. त्या घटनेनंतर काही मिनिटांतच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती पसरली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने तात्काळ भगुरे यांच्या शेतात पिंजरा लावून गस्त वाढवली. अखेर आज दुपारी १२ वाजता द्राक्ष बागेच्या जवळ त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात अडकला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सुरक्षितरीत्या बिबट्याला ताब्यात घेतले.
तीन दिवसांत सलग दोन बिबटे जेरबंद झाल्याने माहेगाव देशमुख व लगतच्या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली बिबट्याची दहशत आता काही प्रमाणात कमी झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी व निरीक्षणासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच परिसरात काही काळ अधिक काळजी म्हणून गस्त सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अद्याप सतर्कता बाळगावी. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासन किंवा वन विभागाला कळवावे.
वन विभागाच्या या प्रभावी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांनी वन विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई