best news portal development company in india

कडकडीत बंद पाळून.कोपरगाव ता. कारवाडी येथे अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

SHARE:

प्रतिनिधी : किसान सोनवणे, कारवाडी
कारवाडी:कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निमित्ताने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी संपूर्ण कारवाडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्पष्टवक्ते व कणखर नेतृत्व आपल्यातून हरपल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी या शोकसभेत सहभागी होत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित या शोकसभेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित दादा पवार यांच्या कार्याचा, त्यांच्या नेतृत्वाचा आणि महाराष्ट्रासाठी केलेल्या योगदानाचा गौरव केला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते किसनराव सोनवणे, सरपंच मंगेश लोकरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल खरे, गणेश शिलेदार, नंदू मोरे, साईनाथ कोकाटे, नामदेव खुळे, निरंजन बनकर, बंटी ताम्हणे, भूषण जोशी, ग्रामविकास अधिकारी भिसे भाऊसाहेब, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल दादा दंडवते, दिलीप बनकर तसेच कारवाडी येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
शोकसभेच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण असून ग्रामस्थांनी एकजुटीने आपली भावना व्यक्त केली.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई