प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:कोपरगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः दहशत माजवली असून, वन विभागाने पिंजरे लावून काही बिबटे जेरबंद केले असतानाही बिबट्याचे हल्ले सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता माहेगाव देशमुख येथील रहाणे वस्ती परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा थरारक हल्ला केला. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन नागरिकांवर अचानक झडप घालत बिबट्याने जोरदार हल्ला चढवला.
या हल्ल्यात पांडुरंग भगवंत पानगव्हाणे (वय ६०)सोमनाथ भानुदास दिघे (वय ४७)हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव विधानसभा
मतदारसंघाचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या.
महत्त्वाचे म्हणजे माहेगाव देशमुख शिवारात ही दुसरी बिबट्याची घटना असून, यापूर्वीही बिबट्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून या परिसरात तातडीने पिंजरे लावावेत, रात्री गस्त वाढवावी,बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे.
सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, आता वन विभाग काय ठोस भूमिका घेणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, एकटे जाणे टाळावे आणि बिबट्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र“
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





