प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी विजय यादवराव रक्ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्या रिक्त जागेसाठी सहकार विभागाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि त्यामध्ये विजय रक्ताटे यांची एकमताने निवड झाली.
गौतम सहकारी बँकेच्या रिक्त उपाध्यक्ष पदासाठी ही निवडणूक अभ्यासिका अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एस. पी. रुद्राक्ष आणि वडगाव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. उपाध्यक्षपदासाठी विजय यादव रक्ताटे यांच्या नावाची सूचना संचालक बाबुराव थोरात यांनी मांडली, तर सदर सूचनेला माजी उपाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी अनुमोदन दिले. यानंतर निवडणूक अधिकारी एस. पी. रुद्राक्ष, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कोपरगाव यांनी विजय रक्ताटे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या निवडणुकीप्रसंगी बँकेचे अध्यक्ष संजय आगवान, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. क्रांती, संचालक राजेंद्र ढोमसे, बापूराव जावळे, कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते, तुकाराम मुळेकर, उत्तम भालेराव, रूपाली संसारकर, लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर, ॲड. मासूम सय्यद, रामराव माळी, शरद होन, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब हिमोड व वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विजय रक्ताटे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे, कर्म शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार संतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बँकेचे अध्यक्ष संजय आगवान, माजी उपाध्यक्ष सुनील डोंगरे व सर्व संचालक मंडळानेही शुभेच्छांचा वर्षाव केला.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष विजय रक्ताटे म्हणाले, “मी शेतकरी कुटुंबातून आलो असून शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांची मला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि बँकेच्या प्रगतीसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करणार आहे.”
या निवडीमुळे गौतम सहकारी बँकेच्या नेतृत्वात नवचैतन्य येणार असून, बँकेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र“
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





