best news portal development company in india

माहेगाव–कुंभारी शिवरस्त्यावर बेकायदेशीर वाळू तस्करीचा सुळसुळाट; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात 28 जानेवारीला ‘ढोल बजाओ’ आंदोलन

SHARE:

प्रतिनिधी : प्रकाश शिंदे, कारवाडी
कारवाडी:मौजे माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील माहेगाव–कुंभारी शिवरस्ता परिसरात वनपरिक्षेत्रातील जमीन गट क्रमांक ५/२ मधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, वाळू माफियांना आता कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या वाळू तस्करीविरोधात प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी निवेदने देण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, काही प्रशासकीय अधिकारी तक्रारदारांची नावे वाळू माफियांपर्यंत पोहोचवत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे तक्रारदारांवर दबाव आणण्याचे प्रकार घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, वाळू माफियांवर मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. “जोपर्यंत अशा कठोर कारवाया होत नाहीत, तोपर्यंत हे वाळू माफिया थांबणार नाहीत,” असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आणि न्याय मिळावा या मागणीसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, या मागणीसाठी दिनांक 28 जानेवारी 2026, बुधवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोपरगाव येथील आमदारांचे जनसंपर्क कार्यालय (गौतम बँक शेजारी) येथे ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनामुळे कोपरगाव तालुक्यातील बेकायदेशीर वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई