best news portal development company in india

गुटखा माफियाचा सलून चालकावर प्राणघातक हल्ला; पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे विंचूरमध्ये दहशतीचे वातावरण

SHARE:

प्रतिनिधी विंचूर

विंचूर:परिसरात कायदा व सुव्यवस्थेची अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, गुटख्याच्या बेकायदेशीर धंद्याला अडथळा ठरतो असा संशय घेत या कारणावरून सलून चालकावर थेट प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विंचूरमधील कुख्यात गुटखा माफिया निलेश बोराने त्याच्या एका साथीदारासह गणेश साळुंके (रा. विंचूर) या सलून चालकावर निर्घृण मारहाण केली.


या हल्ल्यात गणेश साळुंके यांच्या दोन बरगड्या तुटल्या असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र इतकी गंभीर दुखापत होऊनही लासलगाव पोलिसांनी संबंधित प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस यंत्रणेने या गुटखा माफियाची अप्रत्यक्षपणे पाठराखण केल्याचा थेट आरोप तक्रारदार व स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेतील ‘निलेश’ नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वरदहस्तामुळेच गुटखा माफियाने विंचूर व परिसरात बिनधास्तपणे अवैध व्यवसायाचे जाळे पसरवले असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या कथित संगनमतामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, आता ते थेट सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठू लागल्याचे चित्र आहे.
या घटनेनंतर विंचूर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कायद्याचा धाक पूर्णपणे संपल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. “अशीच परिस्थिती कायम राहिली, तर नाशिक जिल्हा उद्या ‘बीड जिल्हा सदृश’ भयावहतेकडे ढकलला जाणार नाही ना?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, विंचूर परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री, मुरूम उत्खनन व इतर बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ धडक कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. तसेच या माफियांना संरक्षण देणाऱ्या तथाकथित भ्रष्ट अंमलदारांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हल्लेखोरांवर गंभीर कलमे लावून तात्काळ अटक करावी, पोलीस व महसूल यंत्रणेच्या निष्क्रियतेची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी, तसेच पीडित गणेश साळुंके यांना संरक्षण व न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी विंचूर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातमीसाठी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई