best news portal development company in india

“कोपरगावची कन्या शिवकन्या घोरपडे ठरली टेबल सॉकरची राज्यस्तरीय मानकरी!”

SHARE:

कोपरगाव (प्रतिनिधी) : प्रकाश शिंदे
कोपरगांव:आर्यवीर कराटे क्लासचे प्रमुख प्रशिक्षक व संचालक माननीय श्री. सुदर्शन पांढरे सर तसेच प्रमुख शिक्षिका वर्षा देठे मॅडम यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कोपरगावची होतकरू विद्यार्थिनी कुमारी शिवकन्या दिलीप घोरपडे हिने शालेय शासकीय टेबल सॉकर स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


   ही स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर, तसेच जीत कुने डो असोसिएशन सोलापूर आणि टेबल सॉकर असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.


   श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थिनी असलेल्या शिवकन्या घोरपडे हिने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशामुळे शाळेचे नाव जिल्हा व राज्य पातळीवर उजळले आहे.
शिवकन्या ही कोपरगाव तहसील येथील टपाल विभागातील कर्मचारी दिलीप अण्णा घोरपडे यांची कन्या असून लहानपणापासूनच खेळाची आवड असलेली विद्यार्थीनी आहे. तिच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन, शाळेचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिवकन्या घोरपडे हिचे विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी प्रकाश गोविंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, कारवाडी नवनाथ पांडुरंग वाघ, सामाजिक कार्यकर्ते, माहेगाव देशमुख किशोर आसाराम झुंबरबाई मिसाळ, दहेगाव बोलका, सामाजिक कार्यकर्त्या शिवकन्याचे कौतुक केले. व “शिवकन्याला भविष्यात आणखी मोठी यशशिखरे गाठता येवोत, हीच साईचरणी प्रार्थना,” असे सर्व शुभेच्छुकांनी व्यक्त केले आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई