best news portal development company in india

पुणतांब्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मोठा निर्णय!
जुने के.टी. वेअर होणार ‘व्हर्टिकल बॅरेज’ — पाणीसाठ्यात २०% वाढ, गळती शून्य…

SHARE:


राहता प्रतिनिधी : रमेश नळे

शिर्डी, दि. २१ :पुणतांबा व परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा ऐतिहासिक निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला आहे. पुणतांबा येथील जुने के.टी. वेअर आता आधुनिक ‘व्हर्टिकल बॅरेज’ मध्ये रूपांतरित करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे पाणीसाठ्यात तब्बल २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या बॅरेजमुळे पाण्याची गळती पूर्णतः थांबणार असल्याने पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४० ते ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुणतांबा व आसपासच्या गावांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
पाण्यासोबतच विजेच्या प्रश्नावरही मोठा निर्णय घेतला असून, पुणतांबा परिसरात ७६ एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी व पिंपळवाडी येथील शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीजपुरवठा मिळणार असून शेती उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
पुणतांबा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, दत्तू धोजे, डॉ. धनंजयराव धनवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारे प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आली.
विखे पाटील म्हणाले की, गोदावरी कालव्याच्या १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ४०० कोटी रुपयांचा निधी नूतनीकरण व सक्षमीकरणासाठी देण्यात आला आहे. वितरिका क्रमांक १८ व १९ च्या माध्यमातून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
याशिवाय कोकणात वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी ९० हजार कोटींचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पातून ८५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातील ५५ टीएमसी जायकवाडी, १५–२० टीएमसी भंडारदरा आणि १५ टीएमसी मुळा धरणात सोडण्याचे नियोजन आहे.
शिर्डी एमआयडीसीमध्ये संरक्षण साहित्य उत्पादनाचा ‘हब’ विकसित होत असून, निबे समूह व टाटा समूहाच्या २०० कोटींच्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
हरेगाव येथे १७ हजार कोटींच्या ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्पातून १० हजार रोजगार, तर शिर्डी विमानतळ विस्तारासाठी ७०० कोटींचा निधी देण्यात आला असून, एमआरओ सेंटरमुळे ५ हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असून, स्मारकाच्या जागेचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच साताऱ्यातील ‘मिलिटरी अपशिंगे’ व नगरमधील घोसपुरी गावांच्या धर्तीवर प्रत्येक गावात सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारके उभारावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणतांबा येथील गावठाण विस्तार, पाणीपुरवठा योजना व घरकुलांसाठी २२ एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व विकासकामांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
एकंदरीत, पुणतांबा व परिसरासाठी पाणी, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ही घोषणा मैलाचा दगड ठरणार असून, ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारी ठरली आहे.

प्रतिनिधी:रमेश नळे,राहता
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई