best news portal development company in india

वेळापूर गोरे वस्तीवर बिबट्या जेरबंद; शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास…वन विभागाची ‘सर्जिकल स्ट्राइक’!

SHARE:


प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोपरगाव तालुका | वेळापूर | दि. 12 जानेवारी 2026

कोपरगाव:तालुक्यातील वेळापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सोमवार, दि. 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजता वेळापूर शिवारातील गोरे वस्तीवरील दगडू बाळाजी गोरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अलगद अडकला.

शेतकऱ्यांची मागणी आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने वेळापूर शिवारातील गोरे वस्ती परिसरात पिंजरा लावला होता. गेल्या काही दिवसांपासून वन विभागाचे कर्मचारी या पिंजऱ्यावर सातत्याने लक्ष ठेवून होते. अखेर भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच गोरे वस्तीवर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. बिबट्या पकडला गेल्याने आता शेतीची कामे निर्भयपणे करता येतील, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभागाच्या या यशस्वी कारवाईबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, वन विभागाने बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवले असून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई