best news portal development company in india

मोठी बातमी | जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ…
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; निवडणूक प्रक्रियेस 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत वेळ…

SHARE:



प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर | दि. 12 जानेवारी
सिन्नर:राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता ही प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपूर्वी अपेक्षित असलेल्या निवडणुका आता लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून निर्माण झालेला कायदेशीर पेच, तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे अतिरिक्त वेळेची मागणी केली होती. यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२६ होती. मात्र न्यायालयाने आयोगाची भूमिका ग्राह्य धरत ही मुदत वाढवून १५ फेब्रुवारी २०२६ केली आहे.

या निर्णयामुळे निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, या आदेशामुळे निवडणुकीचा मार्ग स्पष्ट झाल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया अखेर पूर्णत्वाकडे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागण्याची शक्यता आहे. जिल्हा व तालुका पातळीवर राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे.


तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक कधी व्हावी, असे तुम्हाला वाटत.आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा.
अशाच जलद व विश्वासार्ह अपडेट्ससाठी एवन न्यूज महाराष्ट्र’ चॅनलला सबस्क्राईब करा.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई