Aone News Maharashtra प्रतिनिधी, नाशिक :महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नैताळे मतोबा महाराजांच्या पवित्र नगरीत चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे सत्र सातत्याने सुरू असून, पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी येथील दोन मेडिकल दुकानाचे शटर फोडून चोरी करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नैताळे येथील शेतकरी श्री. लहानु फकीरा बोरगुडे यांची पिकअप गाडी (क्रमांक MH 15 DK 3277) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या चोरीस गेलेल्या वाहनाचे घोटी टोल नाक्यावरून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, सदर वाहन मुंबईच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्यापही वाहनाचा शोध लागलेला नसल्याने वाहनधारकासह परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या सततच्या चोरीच्या घटनांमुळे नैताळे गावातील व्यापारी, शेतकरी व भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. “गावात वारंवार चोरी होत असताना पोलिस गस्त का वाढवली जात नाही?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, चोरीस गेलेले वाहन कुठे आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ९६२३८८१३३० या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी केले आहे.
आता तरी पोलीस प्रशासन या वाढत्या चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का, याकडे संपूर्ण निफाड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





