best news portal development company in india

नगर पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त नव्या वाहनांचे लोकार्पण; कायदा-सुव्यवस्थेसाठी बळकटी

SHARE:

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी: राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून नगर पोलीस प्रशासनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पण नगर पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात पार पडले. यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
   

सदर सोहळ्यात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, आव्हानात्मक परिस्थितीत पोलीस प्रशासनासाठी सक्षम व तत्पर यंत्रणा अत्यावश्यक असते. नव्याने उपलब्ध झालेल्या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


      यावेळी जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रभावी व कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात वाढत असलेल्या आर्थिक गुन्हेगारी व सायबर गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.
    या लोकार्पण सोहळ्यासनगराध्यक्ष सौ. जयश्रीताई थोरात,
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे,शिर्डी संस्थानचेमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर,
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे,प्रांताधिकारी श्री. माणिक आहेर,तहसीलदार श्री. अमोल मोरे,मुख्याधिकारी श्री. सतीश दिघे,पोलीस उपाधीक्षक श्री. अमोल भारती
यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन वाहनांच्या समावेशामुळे नगर पोलीस दल अधिक सक्षम, गतिमान व आधुनिक बनून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई