राहाता | प्रतिनिधी रमेश नळे दि. २१ डिसेंबर २०२५
राहाता:नगरपालिकेवर अखेर भाजप-सेना युतीने आपली एकहाती सत्ता कायम राखत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. २० नगरसेवकांच्या जागांपैकी तब्बल १९ जागांवर भाजप-सेनेचे उमेदवार विजयी झाले असून विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे.या निवडणुकीत विखे पाटील गटाने आपला बालेकिल्ला राखत ‘गड राखला’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच शहरात भाजप-सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद साजरा केला.
राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे स्वाधीन गाडेकर यांनी बहुमताने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. त्यांच्या विजयामुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
या निवडणुकीत राहाता नगरपालिका शहर विकास आघाडीचे उमेदवार शशिकांत लोळगे यांनी एकमेव विजय मिळवला आहे. मात्र भाजप-सेनेच्या वर्चस्वापुढे विरोधक पूर्णतः कमजोर ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राहाता शहरात सुरू असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी भाजप-सेनेवर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
राहता शहरात विजयोत्सवाचे वातावरण झाले असून निकाल जाहीर होताच शहरभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा करत एकमेकांचे अभिनंदन केले.
राहाता नगरपालिकेच्या या निवडणुकीत भाजप-सेनेने मिळवलेला दणदणीत विजय हा आगामी राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राहता
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





