best news portal development company in india

बिबट्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शांताबाई निकोले यांच्या वारसांना १० लाखांची मदत.. आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; वन विभागाकडून आर्थिक सहाय्याचा धनादेश सुपूर्द..

SHARE:

प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी

    कोळपेवाडी:मागील महिन्यात सोमवार दिनांक १० रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या अंदाजे ६० वर्षीय शांताबाई आईलाजी निकोले यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात शांताबाई निकोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

   घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे हे अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच मयत शांताबाई निकोले यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी ठोस मागणी त्यांनी केली होती.

   आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत वन विभागाकडून मयत शांताबाई निकोले यांच्या वारसांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीचा धनादेश नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत शांताबाई निकोले यांचे वारसदार व त्यांचे पुत्र संतोष निकोले यांना सुपूर्द करण्यात आला.

   या प्रसंगी कोपरगाव गुरुजी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व विद्यमान संचालक राजेंद्र निकोले यांची उपस्थिती होती. आमदार काळे यांनी यावेळी बोलताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार तातडीची मदत मिळावी, यासाठी आपण सदैव पाठपुरावा करत राहू, असे स्पष्ट केले.

    या आर्थिक मदतीमुळे दुःखात असलेल्या निकोले कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आमदार आशुतोष काळे यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,”एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई