प्रतिनिधी: निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडीदि. २० डिसेंबर:कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच, चक्क मतदानाच्या दिवशी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोपरगावमध्ये दाखल झाल्याने शहरात मोठी उत्सुकता आणि चर्चा रंगली होती.

आज सकाळी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावला. अशा वातावरणात अभिनेता सोनू सूद शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी थेट कोपरगाव गाठत येथील आपले जिवलग मित्र अक्षय राक्षे यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली.
विशेष म्हणजे अक्षय राक्षे यांची पत्नी सुरेखा राक्षे या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवार असल्याने, मतदानाच्या दिवशी झालेल्या या भेटीमुळे शहरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले. सोनू सूद आणि राक्षे कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत असून, ते कोपरगावात आले की नेहमीच या कुटुंबाला भेट देतात, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, सोनू सूद यांनी शहरातील काही भागात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच तरुण वर्गासह नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी अभिनेता सोनू सूद यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी उत्साह दाखवला. मात्र या संपूर्ण कालावधीत मतदान प्रक्रिया कुठेही बाधित न होता, शांततेत आणि सुरळीतपणे सुरू होती.
निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली असून, सोनू सूद यांच्या आगमनामुळे कोपरगावच्या राजकीय वातावरणात मात्र वेगळीच चर्चा आणि उत्सुकता पाहायला मिळाली. ऐन मतदानाच्या दिवशी झालेल्या या अचानक भेटीमुळे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीला वेगळाच रंग लाभल्याचे चित्र होते.

कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





