best news portal development company in india

समता पतसंस्थेवरील चौकशी अखेर थांबली; ‘सत्याचा विजय’ – चेअरमन काका कोयटे…

SHARE:

कोळपेवाडी l प्रतिनिधी : निवृत्ती पगार

कोळपेवाडी:समता नागरी पतसंस्थेवर थकबाकीदारांनी केलेल्या आरोपांवरून मागणी करण्यात आलेली चौकशी अखेर सहकार मंत्रालयाने थांबवली आहे. कायदेशीर तपासणीनंतर संस्थेवरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने चौकशी रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी व्यक्त केली आहे.
  समता पतसंस्थेविरोधात काही थकबाकीदारांनी विरोधकांच्या पाठबळावर दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र यापूर्वीच सहकार खात्याच्या चौकशीत संस्थेला क्लीन चिट मिळालेली आहे. याशिवाय उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाने देखील चुकीच्या व तथ्यहीन याचिका फेटाळून लावत संबंधित थकबाकीदारांवर दंड ठोठावला असल्याची माहिती कोयटे यांनी दिली.
संस्थेच्या वतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. विजय गव्हांदे यांनी स्पष्ट केले की, कर्जवसुलीची संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर चौकटीत करण्यात आली आहे. मालमत्ता विक्री व इतर कारवाई नियमांनुसारच झाली असून थकबाकीदारांकडून समक्ष वसुली करण्यात आली आहे. कोणतीही फसवणूक झालेली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
    दरम्यान, निवडणूक काळात संस्थेची बदनामी करण्यासाठी अफवा पसरवण्याचा व सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ज्येष्ठ संचालक जितूभाई साहेब यांनी केला. काही ठराविक थकबाकीदारांना एकत्र करून ८ डिसेंबर रोजी चौकशीची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र १० डिसेंबर रोजी संस्थेने सविस्तर प्रतिवाद दाखल केल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत चौकशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
      संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले की, थकबाकीदारांनी केलेल्या बदनामीविरोधात संस्थेच्या वतीने कायदेशीर दावा दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे समता पतसंस्थेच्या सभासद व ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
      चौकशी थांबवण्याच्या निर्णयामुळे समता नागरी पतसंस्थेला मोठा दिलासा मिळाला असून, संस्थेची प्रतिमा स्वच्छ असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार,
“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई