प्रतिनिधी:निवृत्ती पगार,”एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी …
वेळापूर (ता. कोपरगाव): कोपरगाव तालुक्यातील वेळापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या बिबट्याला आज गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जेरबंद करण्यात आले. वेळापूर शिवारातील गोरे वस्तीवरील गजानन गोरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेळापूर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरणे किंवा दिवसा शेतीची कामे करणेही जोखमीचे झाले होते. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, ग्रामस्थांनी वनविभागाकडे या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची आग्रही मागणी केली होती.
शेतकऱ्यांची मागणी आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने वेळापूर शिवारात पिंजरा लावला होता. गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी यावर लक्ष ठेवून होते. अखेर आज संध्याकाळी भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गजानन गोरे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला.
बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यावेळी गोरे वस्तीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या पकडला गेल्याने आता शेतीची कामे विनासायास करता येतील, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वनविभागाने बिबट्याला सुरक्षितस्थळी हलवले असून, त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





