प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर: जिल्ह्यातील कांद्याचे भाव चांगलेच कडाडले असून, सिन्नर तालुक्यातील हिवरगाव कांदा मार्केटने यावेळी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख बाजारपेठांपेक्षा हिवरगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला सर्वात जास्त भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे.मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल किंमत मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते. परंतु, आता भावात वाढ होताना दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ बघा…
लाल कांद्याचे दर कडाडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी, कमी उत्पादनाची खंत कायम आहे. सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथील मार्केटमध्ये मिळालेल्या उच्चांकी भावानंतर आता जिल्ह्यातील इतर प्रमुख बाजारपेठांमध्येही कांद्याला, विशेषतः लाल कांद्याला,चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील १५ डिसेंबर २०२५ रोजीच्या दरांनुसार, प्रमुख मार्केटमध्ये ही कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. विंचूर उपबाजारात कांदा लालची आवक ३८६ नग नोंदवण्यात आली असून, त्याला सरासरी २३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.लासलगाव येथे लाल कांद्याची आवक १९९४ नग असून, येथे सर्वाधिक कमाल दर ३०४० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला, तर सरासरी दर २३०० रुपये मिळाला. निफाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक केवळ ०५ नग असल्याने, येथे सरासरी २२०० रुपये दर मिळाला आहे, जो मागणी जास्त आणि आवक कमी असल्याचे दर्शवतो. उन्हाळ कांद्याला विंचूर येथे सरासरी १६५० रुपये, लासलगाव येथे २२०० रुपये, तर निफाड येथे २००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
यावर्षी अवकाळी पाऊस आणि रोगराईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. लाल कांद्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, या कारणामुळे दरांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, ही भाववाढ झाली असतानाही कमी उत्पादन निघाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात नेमके काय पडणार, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. चांगला भाव मिळत असला तरी कमी उत्पादन झाल्यामुळे समाधानकारक पैसे मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा मिळवण्यासाठी चांगल्या वातावरणाची आणि भरपूर उत्पादनाची गरज होती, परंतु तसे न झाल्याची खंत त्यांच्या मनात सल करत आहे.
सध्या लाल कांद्याला चांगला बाजार भाव मिळत आहे. विंचूर, लासलगाव, सायखेडा, पिंपळगाव आणि नाशिक यांसारख्या प्रमुख बाजारपेठांच्या तुलनेत सिन्नरमधील हिवरगाव येथील मार्केटमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक जास्त भाव मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र“
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





