नाशिक प्रतिनिधी
नाशिक: जॉगिंग ट्रॅक परिसरात एका तरुणाला तक्रार मागे घेण्यासाठी जबरदस्तीने मारहाण केल्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या पाटणकर टोळीतील सराईत गुन्हेगार श्रवण पगारे याला नाशिक गुंडाविरोधी पथकाने अखेर नवी मुंबईतून अटक केली आहे. आरोपी कामोठे परिसरात जिम ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी सकाळी फिर्यादी आदित्य कांबळे यांना संशयित आरोपींनी शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक परिसरात नेले. जुनी तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आला आणि नकार दिल्याने त्यांना जबरदस्तीने मारहाण करण्यात आली. तसेच, मारहाणीनंतर त्यांच्या खिशातील रोख रक्कमही काढून घेण्यात आली होती. या गंभीर घटनेनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर मुख्य संशयित श्रवण पगारे हा नाशिकमधून फरार झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस संशयित श्रवण पगारेचा कसून शोध घेत होते. दरम्यान, गुंडाविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, हा सराईत गुन्हेगार नाशिक सोडून नवी मुंबईतील कामोठे येथील एका सोसायटीतील जिममध्ये ‘ट्रेनर’ म्हणून काम करत आहे.
या माहितीच्या आधारावर गुंडाविरोधी पथकाने तातडीने नवी मुंबईत धाव घेऊन सापळा रचला आणि मुख्य संशयित श्रवण पगारे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजते.
गुंडाविरोधी पथकाचे एपीआय ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले व सुनिता कवडे या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कामगिरी बजावली. या अटकेमुळे जॉगिंग ट्रॅक मारहाण प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने पुढे सरकेल.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





