प्रतिनिधी:भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर
सिन्नर ,दि : 6 डिसेंबर 2025 दत्त जयंती निमित्त महाराष्ट्रभर उत्सव सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सांगवी या गावात एका समाज कंठकाकडून घृणास्पद घटना घडल्याने स्वामीभक्त व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगवी येथे आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्ट गुरुदत्त आश्रम असून दत्त जयंती निमित्त परिसरात एकच भक्तिमय वातावरणात कार्यक्रम सुरू असताना एका माथे फिरू समाज घकंटकाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती जवळ जाऊन अस्लिश चाळे करत नको त्या ठिकाणी हात लावणे स्वामींच्या खिर्यातून पैसे काढून घेणे स्वामींना पैशाची मागणी करणे व स्वामींच्या मांडीवर आडवे तिडवे पसरून अंगविक्षेप करत नको त्या अवस्थेत कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समाजकंटकावर सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित समाजकंटकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी स्वामी भक्तांसह सर्व समाजातुन होते आहे.
सांगवी येथील आनंद ट्रस्ट आश्रमातील सेवेकरी भाऊसाहेब ठकाजी शिंदे वय 54 यांच्या प्रत्यक्ष पाहणीनुसार सदर बाब समोर आली आहे . दि. 4 डिसेंबर रोजी शिंदे ही नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता आनंदवन आश्रम परमात्मा ट्रस्ट येथे सेवा करण्यासाठी गेले असता तिथे दत्त जयंतीचा कार्यक्रम असल्याने स्वामी देवानंद यांचा प्रवचनाच्या कार्यक्रमानिमित्त मंदिरात भरपूर गर्दी केली होती.. सायंकाळी चार वाजे दरम्यान याच गावातील तरुण शिवनाथ आढाव हा मध्य धुंद अवस्थेत हातात लोखंडी पाईप घेऊन श्री आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्ट येथे आला व प्रवचन चालू असताना श्री स्वामीजींच्या शेजारी व्यासपीठावर येऊन बसला व स्वामीजींच्या खिशातून त्यांच्याशी झटापटी करून मला पैसे द्या असे म्हणून त्यांनी स्वामीजींच्या खिशातून 500 रुपये घेतले…

या वेळी तिथे जमलेल्या सेवेकरी गंगाधर एकनाथ भुमरे,सतीश सुभाष सावळे,किरण काशिनाथ घुमरे,केशव भाऊसाहेब भाऊ मोरे,राहुल बाबासाहेब भिंगट,यांनी रवींद्र शिवनाथ आढाव यांना तेथून बाजूला केले असता या माथेफिरूने सर्वांना धक्काबुक्की करून मला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला एका एकाला बघून घेईन तसेच स्वामीजींना जगू देणार नाही असा दम देऊन तिथून तो निघून गेला दिनांक 3.11.2025 रोजी सकाळी 9:45 वाजेच्या दरम्यान रवींद्र शिवनाथ आढाव यांनी आमची श्री आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्ट सांगवी संचालित अद्वैतानंद गिरी महाराज गुरुकुल शाळेची बस थांबून बस मधील विद्यार्थ्यांना व चालकांना शिविगाळ केलेली होती.
श्री स्वामींच्या आश्रमात जाऊन बसणे मूर्तीच्या श्रीमुखात मारणे. मूर्ती समोर अस्लिश हवभाव करणे मूर्तीला चुकीच्या ठिकाणी हात लावणे असे प्रकार घडत असताना बाळासाहेब विठोबा घुमरे,अशोक सखाराम घोटेकर,मधुकर किसन घुमरे,यांनी बघितले असता त्यास मंदिरातून काढून दिली होती. परंतु 29.9.2019 रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान गावातील मारुती मंदिरात हरिपाठ चालू असताना भजनी मंडळ व भक्तांना धक्काबुकी करत हरिपाठ सांगणारे महाराज यांचा माईक हिसकावुन घेणे.. श्री अशोक महाराज घुमरे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम चालू असताना तिथे जाऊन आरडाओरडा करणे व धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या समाजविरोधक कृत्य करून गावातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत .त्यामुळे या सर्व प्रकारावर पायबंद घालण्यात यावा व संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून स्वामी भक्तामध्ये संताप व्यक्त होत आहे.

सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





