प्रतिनिधी नाशिक…
नाशिक:झाडे वाचवा-तपोवन वाचवा- नाशिक वाचवा.या चळवळीत नसिक शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी स्वतः सक्रिय सहभाग घेतला असून यावेळी तपोवन येथे दिव्यांग बांधवांनी रॅली काढली,जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी दत्तुभाऊ बोडके यांनी मनोगत व्यक्त करतांना,
रामायणामध्ये रावणाचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीराम चंद्रांना त्यांच्या या लढाईत जशी वानर सेनेने सहभाग घेऊन मदत केली, याप्रमाणे आता तपोवन या ठिकाणी साधू-सतांच्या नावाखाली सरकार-महानगरपालिका जे “प्रदर्शन केंद्र” करणार आहे, त्याला विरोध करण्यासाठी शहरातील- जिल्ह्यातील दिव्यांग बांधवानी जोरदार पाठिंबा दिला.
सरकारने आणि महानगरपालिकेने झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करून, प्रदर्शन केंद्राची निविदा प्रक्रिया स्थगिती दिली नाही,तर आम्ही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने राजीव गांधी भवन,महानगरपालिका आयुक्त कार्यालयात थेट आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी रवींद्र टिळे,संतोष मानकर, ललित पवार,बबलू मिर्झा,बच्चु निकाळजे,ललिताताई पवार,दत्तू बोडके,अनिल भडांगे,विशाल पाटील,नितीन गवळी,प्रमोद केदारे,सोमनाथ नागरे,राजू देसले, प्रभाकर धात्रक,तल्हा शेख,हिरामण मनोहर,ओमकार वेळमकर,विजय सोनार,राजेंद्र गायकवाड,संजय पवार,वंदना शिंदे,वैशाली चव्हाण, मनीषा स्वामी,दिनेश स्वामी,पी.एच. जोशी सर,हिरामण गोड,राहुल मुदकर,विजय वाळवे, मतेनकर सर, तसेच मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी उपस्थित होते.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





