प्रतिनिधी:अनिल डोमाडे,लासलगाव
लासलगाव:महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात केली जाते अशा तालुक्यात ऊसतोड कामगार तसेच द्राक्ष बागेसाठी अनेक मजूर शेतावर येऊन उतरतात त्या गोरगरीब मजुरांना थंडीमध्ये या सतरंज्यांचे तसेच ब्लॅंकेटचे वाटप त्यांच्या तांड्यावर जाऊन मंडळाच्या वतीने करण्यात आल्यामुळे एक प्रकारे आगामी थंडीची चाहूल कमी करण्याचा हा मंडळाचा प्रयत्न निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
गरजवंतांना दिवाळीनिमित्त चांगले कपडे मिळावे म्हणून लासलगाव शहरात साकारण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून गरजवंतांना कपड्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर राहिलेल्या कपड्यावर प्रक्रिया करत त्याच्या सतरंज्या बनवून व लोकसहभागातून जमा झालेल्या वर्गणीतून नवीन ब्लॅंकेट ची खरेदी करत ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर जाऊन थंडीच्या दिवसात उबदार कपडे वाटपाचे अनोखे कार्य शहरातील परमपूज्य भगरीबाबा आधार फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

गरजवंतांना दिवाळीत चांगले कपडे घेणे शक्य होत नाही, दीपावलीनिमित्त अनेक नागरिकांकडून घरातील चांगले कपडे बाजूला काढले जातात, याच कपड्यांचा वापर गरजूंना करता येईल आणि त्यांची दीपावली चांगले कपडे घालून गोड व्हावी या हेतूने परमपूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन यांच्यावतीने लासलगाव शहरात माणुसकीची भिंत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने जवळपास २० हजार पेक्षा जास्त गरजवंतांना ४ लाखापेक्षा अधिक चांगल्या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
वाटप केलेल्या कपड्यानंतरही जे कपडे शिल्लक राहिले त्या कपड्याचे बारीक तुकडे करत त्यावर प्रक्रिया करून त्याच्या सतरंज्या तयार करण्यात आल्या तसेच या फाउंडेशन च्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केल्याने मोठ्या संख्येने ब्लॅंकेट खरेदी करून त्याचे गुरुवारी वेळापूर येथील ऊसतोड कामगारांनी प्रत्यक्षात जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी भगरी बाबा आधार फाउंडेशनचे सदस्य व विविध सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

लासलगाव
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





