best news portal development company in india

शहा येथील बेकायदा खडी व मुरूम वाहतूक करणाऱ्या जे.सी.बी.व ट्रक महसूल विभागाकडून जप्त.. सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला काही तासांतच यश …

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

———————————————————————-
सिन्नर:  तालुक्यातील शहा येथे जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाच गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जल तलावाचे काम चालू आहे.या तलावातून मोठ्या प्रमाणात दगड निघाला आहे व तो सर्व दगड जवळच 707 गट नंबर साठवला आहे. परंतु हा दगड शर्ती व अटी आणि प्रदुषण नियंत्रण प्राधिकरणाच्या नियमाचं परीपुर्ण पालन न करता सर्रास वाहतूक सूरू आहे. या कामासाठी संबंधित ठेकेदाराने खडी क्रेशर एक मशिन. तिन चार जे.से.बी.सह मोठा कामगार वर्ग व वाहतूक करण्यासाठी जवळ पास आठ – दहा हयवा ट्रक ह्या सर्व साधनसामग्री शहा येथे रात्रंदिवस खडी वाहतूक सुरू होती.

     https://youtu.be/5n1b3bLMmXk?si=TyhsinEj6oIIve24

या मालमत्तेचे वाहतूक करणाऱ्या कडुन शहा ग्रामपंचायत तीला ( गावाला )कुठलाही महसूल मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने यासाठी परवानगी दिली नसल्याचे दिसून आले आहे. तरी अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.‌ या सर्व प्रकाराची चौकशी केली जावी यासाठी विजय घोडेराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे संबंधित विभागाला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास दिनांक 27 ऑक्टोबर पासून थेट त्याच जागेवर आंदोलन करण्यात येईल असे आवाहन केले होते.

    परंतु आंदोलनाच्या काही दिवस आधीच संबंधित ठेकेदाराने सर्व मशिनरी या जागेवरून हालवले व  दगड व खडी वाहतूक बंद केली.. त्यानंतर आता आंदोलन रद्द झालं असावं असं अंदाज आल्याने या ठेकेदाराने पुन्हा जे.से.बी .आणले व काम सुरू करण्याच्या प्रयत्नात असतानाच जाहीर केल्याप्रमाणे दिनांक 27 ऑक्टोबर पासून थेट‌‌‌ जागेवर च आंदोलन सुरू केले तेव्हा या जे.से.बी.संदार्भात चौकशी केली असता सदरील प्रकार उघडकीस आला व आंदोलन कर्त्यांनी शहा मंडळ अधिकारी व तलाठी याच्या लक्षात आणून दिले.

       संबंधित सर्कल व तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली व हा प्रकार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाल्याने वावी पोलिस स्टेशनच्या मदतीने संबंधित मशिनरी जप्त करण्याची कारवाई केली. जागेवर पंचनामा करून जे.से.बी.व ट्रक वावी पोलिस स्टेशन ला जमा करून सर्कल व तलाठी शेख व कर्मचारी बैरागी यांनी पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

     या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे.नवनाथ वाघ. किसन सोनवणे . मौलाना अफजल.हे सहभागी झाले होते. या आंदोलनाला विजय घोडेराव.शिवाजी घोडेराव व शहा ग्रामस्थांनी पाठींबा दिला होता.. तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई