best news portal development company in india

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने समिती प्रमुख नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण श्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयामध्ये कुंभमेळा मंत्री समितीची बैठक….

SHARE:

प्रतिनिधी

        मुंबईत मंत्रालयामध्ये कुंभमेळा मंत्री समितीची बैठक पार पडली. कुंभमेळा मंत्री तथा समिती प्रमुख नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण श्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस उपस्थित होतो. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने या बैठकीत विचारमंथन करण्यात आले.

       या बैठकीत बोलताना, त्र्यंबकेश्वर कुशावर्तावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्माण होत आहेत, त्या कायमस्वरूपी नाशिकच्या जनतेला उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचे सूचित केले. तसेच गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर देखील तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली. सांडपाणी नदीपासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे आणि त्यावर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे यावेळीही प्रशासनाला निर्देशित केले. सारडा सर्कल पासून द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुल उभारणी, नाशिक कलाग्राम सुरू करणे, सिंहस्थ काळात भाविकांना जास्त पायी चालायला लागू नये यासाठी उपाय योजना, पोलिसांचे बळकटीकरण, बाहेरून येणाऱ्या पोलिसांची निवास व्यवस्था, साधूग्राम,नाशिक विमानतळ विस्तारीकरण आणि दुसरे टर्मिनल उभारणे याबाबत सूचना केल्या.

        तसेच मंत्रिसमितीतील अन्य सदस्यांनी देखील नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधणे, द्वारका ते नाशिक रोड ट्राफिक बाबत उपायोजना, विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिकचे ब्रँडिंग, औद्योगिक क्षेत्रात उद्योग प्रशिक्षणासाठी जागा, कुंभमेळा नियोजन तीन टप्प्यांत करणे, राज्य परिवहन महामंडळासाठी 200 नवीन बसेस, नाशिक विमानतळ परिसरात आणि इतर ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा उभारणी अशा गोष्टींची आवश्यकता व्यक्त केली. याबरोबरच सप्तशृंगी गड, तिर्थटाकेद, कपिलधारा तीर्थ, तपोवन, राम मंदिर इगतपुरी या तीर्थक्षेत्रे व पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची देखील मागणी मांडण्यात आली.

        या बैठकीत कुंभमेळा प्राधिकरण व संबंधित विविध विभागांचे सादरीकरण, तसेच अशा विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपस्थित सर्व मंत्री समितीतील सदस्यांनी प्रशासनामार्फत तसेच शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत व त्यातून करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त करून नाशिकचा कुंभमेळा हा उत्कृष्ट व प्रभावीपणे करून देशात परदेशात लौकिक व्हावा अशी भावना व्यक्त केली.

       या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सा. बां. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, क्रीडा युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह सा. बां. विभाग अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. ए.एच. गोविंदराज, ग्रामविकास विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे,नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, राप महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुशेकर,  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग,महापालिका आयुक्त मनीषा खत्री,नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलज शर्मा,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई