प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर : दि. 29 ऑक्टोबर 2025 —
शेतकऱ्यांची जाण असलेलं आणि शेतकरी कुटुंबातील एका सामान्य व्यक्तीला आज कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरच्या सभापती होण्याचा मान मिळाला , ही खऱ्या अर्थाने सिन्नर तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पूर्व भागातील पांगरी गावातील तरुण व्यक्तिमत्व श्रीकृष्ण घुमरे अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व तसेच शेतकऱ्यांच्या निगडित व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींची बारकावे माहित असलेलं हे व्यक्तिमत्व आहे.

त्यामुळे या सभापती पदाचा वापर ते त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करतील अशी मला खात्री आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद हे एक मोठे आणि महत्त्वाचे पद आहे. या पदावर काम करताना शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करणे, बाजारपेठेतील व्यवहारांची नियमन करणे आणि कृषी उत्पादनाच्या विपणनासाठी मार्केटिंग साठी योग्य धोरणे राबवणे , तसेच शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि गैरव्यवहारापासून शेतकऱ्यांना वाचवणे, बाजारपेठेत शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणे, राज्य सरकार आणि कृषी विभागाने तयार केलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी करणे आणि त्यातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व त्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळवणे या सर्व नियमांचे आपण पालन करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करशाल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे. आपल्या कार्यकाळामध्ये सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची नक्कीच भरभराट होईल आणि आपण शेतकऱ्यांसाठी अंतकरणापासून काम कर शाल अशी अपेक्षा .
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





