पत्रकार:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
दरम्यान, २४ ऑक्टोबरच्या सुमारास मध्य आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची प्रणाली तयार झाली होती, त्यामुळे २६-२७ ऑक्टोबरपर्यंत वेगाने वादळात रूपांतरित होऊ शकते. व २८ ऑक्टोबरच्या सुमारास मछलीपट्टनम आणि काकीनाडा किनाऱ्यांदरम्यान कमकुवत चक्रीवादळाच्या रूपात ती जमिनीवर धडकू शकते.
नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सायंकाळच्या दरम्यान दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी धुमाकूळ घातला.मागील महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते व संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घालत शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले,त्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.. त्याला तोंड देत असतानाच पुन्हा पावसाने डोक वर काढत जवळपास सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे..
सिन्नर तालुक्यात ही रात्रभर मुक्कामी असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पाऊस रात्रभर मुक्कामी असुन मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून बारा तास उलटून गेले तरी पावसाचा जोर कायम आहे…

सध्या, भारताच्या आग्नेय आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्रावर ९२A हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, जो उत्तर-वायव्येकडे सरकत आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता कमी आहे आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्राजवळ येऊन कमकुवत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २४ ऑक्टोबरच्या सुमारास मध्य आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची प्रणाली तयार झाली होती, त्यामुळे २६-२७ ऑक्टोबरपर्यंत वेगाने वादळात रूपांतरित होऊ शकते. व २८ ऑक्टोबरच्या सुमारास मछलीपट्टनम आणि काकीनाडा किनाऱ्यांदरम्यान कमकुवत चक्रीवादळाच्या रूपात ती जमिनीवर धडकू शकते. ऑक्टोबरच्या सुमारास मछलीपट्टनम ते काकीनाडा किनाऱ्यादरम्यान ते कमकुवत चक्रीवादळाच्या रूपात जमिनीवर धडकू शकते.
यानंतर, ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण चीन समुद्रातून आणखी एक प्रणाली विकसित होऊ शकते, परंतु तिचा विकास आणि मार्ग ट्रॅक अद्याप अनिश्चित नाही.सर्वात जलद हवामान अंदाजा वर्तविण्यात आला आहे.
पुढील ३ तासांत मध्य व उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर,धुळे,जळगाव,नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे व मुसळधार पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.नागरिकांनी सतर्क राहावे.
तर पुढील ३ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा जोर कायम राहील संभाजीनगर,बीड,धुळे,हिंगोली,जळगाव,जालना,लातूर,नांदेड,नंदुरबार,नाशिक,परभणी येथे विजांसह वादळ व ताशी ३०-४० किमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यातच पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार उडाला आहे व अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे.. साधारणतः हा पाऊस 28 ऑक्टोबर पर्यंत राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे..

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





