best news portal development company in india

प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी मंत्रालयात मेंढपाळांच्या विविध मागण्यासाठी लढा यशस्वी….

SHARE:

 मंत्रालय येथे मेंढपाळ बांधव यांच्या न्याय हक्कासाठी मा बचू भाऊ कडू यांनी उभरलेला लढा आज यशस्वी…

 प्रतिनिधी नाशिक:मेंढपाळांच्या समस्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.विधानभवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर बैठक झाली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अॅड माणिकराव कोकाटे,पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले,वने मंत्री.गणेश नाईक, कामगार मंत्री आकाश फुंडकर,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील उपस्थित होते.तसेच दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. याबरोबरच संबंधित विभागाचे सचिव आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 नाशिक जिल्ह्याच्या वतीने मेंढपाळ बांधवांसाठी मेंढपाळ आर्मी संरक्षण समितीचे अध्यक्ष समाधान बागल यांनी. मेंढपाळांची प्रश्न या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर,मांडण्यात आले.यावेळी मेंढपाळसंदर्भात निर्णय मार्गी लागले.

जून ते सप्टेंबर दरम्यान वन विभागात चराईसाठी परवानगी देण्यात आली.

राज्यभरात जेवढेही मेंढपाळ बांधावरती गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यासनिर्णय घेण्यात आला.

मेंढपाळ बांधव साठी स्वतंत्र असाकायदा करून संरक्षण देण्याचेनिर्णय घेण्यात आला.

 मेंढी शेळी मृत्युमुखी पडतात.त्यावरती विशेष पॅकेज जाहीर करण्याचे ठरले,तसेच पंचनामे करून, तातडीने निर्णय घेण्यात आला.

 शेळी मेंढी यांच्यासाठी स्वतंत्र विमा प्रणाली तयार करण्यात येईल.

 अशाप्रकारे मेंढपाळ साठी राज्यभर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले.

या प्रसंगी, , बच्चुभाऊ , जवंजाळ गणेश भाऊ निबाळकर, समाधान बागल नाशिक जिल्हा मेंढपाळ आर्मी संरक्षण समितीचे अध्यक्ष,अर्जुन महानोर,मेंढपाळ आर्मी अमरावती, आनंद बनसोडे,तसेच काही मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई