best news portal development company in india

वक्फ सुधार कायदा 2025 या पुस्तकाचे नाशिक येथे प्रकाशन,

SHARE:

आज नाशिकमध्ये इल्म व हुनर फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने प्रसिद्ध इस्लामी विद्वान मुफ्ती मंझुर जियाई यांच्या नेतृत्वाखाली वक्फ सुधार कायदा 2025 पुस्तक प्रकाशन…

 नाशिक: आज नाशिकमध्ये इल्म व हुनर फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने प्रसिद्ध इस्लामी विद्वान मुफ्ती मंझुर जियाई यांच्या नेतृत्वाखाली वक्फ सुधार कायदा 2025 फायदे आणि तोटे या शीर्षकाने नाशिक मध्ये प्रकाशित करण्यात आले, या प्रकाशन समारंभ वेळी मुफ्ती अल्लाउद्दीन रजवी(शहर काजी ठाणे जिल्हा) मौलाना अखलाक निजामी (जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया अलेमा बोर्ड, मुंबई)तसेच नाशिक मधील अनेक प्रमुख राजकीय सामाजिक व धार्मिक व्यक्तींनी उपस्थिती लावली उपस्थित लावली.

   मुक्ती मंझुर जियाई यांनी पुस्तक प्रकाशनावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली, पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की मी देशवासीयांना आव्हान करतो की हे पुस्तक संपूर्ण देशभरात प्रकाशित करण्यात येणार असून सर्वांनी नक्की वाचावे समजून आणि यातील तथ्य जाणून घ्यावे, हे पुस्तक तुम्हाला तुमच्या हक्काबद्दल सांगते तुमच्या मागील संपत्ती बद्दल माहिती देते,संपूर्ण देशभरात तुमची संपत्ती अस्तित्वात आहे, पण त्यावर इतरांचा ताबा आहे, यावर्षी पुढे म्हणाले की, या पुस्तकाच्या वाचनातून तुम्हाला अनेक महत्त्वाचे तथ्य समजतील आणि हेही कळेल की आमच्या पूर्वजांनी गरीब व गरजूसाठी जी संपत्ती वक्फ केली होती ती आज कोणाच्या ताब्यात आहे, वक्फ सुधार कायदा 2025 बद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केली की हा कायदा किती फायदेशीर आहे आणि किती तोट्याचा आहे हे समजून घ्या जे फायद्याचे आहे ते स्वीकारा आणि हानिकारक आहे त्या विरोधात न्यायालयात जावे असे सांगितले.

   या पुस्तकात स्पष्ट केले आहे की,तुमचे हक्क आणि अधिकार काय आहेत तुमच्या पूर्वजांनी आपली मेहनतीची कमाई आपल्या मुलांना न देता समाजासाठी वक्फ केली होती की जेणे करून समाजाचे भवितव्य सुधारू शकेल…

“वक्फ सुधार कायदा 2025” हे पुस्तक देशातील संपूर्ण राज्यांमध्ये प्रकाशित केले जाणार आहे, सध्या ही उर्दू भाषेत असून हे पुस्तक सर्व प्रकारच्या भाषांमध्ये उदा. मराठी, हिंदी, इंग्लिश छापले जाणार आहे,जर तुम्ही हे पुस्तक वाचले नाही तर तुमच्या मुलांना शाळा मिळणार नाही,रुग्णालय मिळणार नाही जसे आज पर्यंत तुम्ही या सुविधांपासून वंचित आहात म्हणून या सर्व गोष्टी जाणून घेणे, अतिशय अत्यावश्यक आहे त्यांनी स्पष्ट केले की आमच्यावर आरोप करणारे लोक आरोप करत राहतील पण जे लोक आमच्या वेदनात समजून घेतील आणि पुस्तक वाचतील त्यांना सत्य कळेल, आणि ते अशा प्रकारचे आरोप करणार नाही, हे पुस्तक शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे, म्हणून आम्ही तीन हजार प्रती वक्फ केल्या आहेत,म्हणजे हे पुस्तक मोफत वितरित केले जाईल जेणेकरून लोक ते वाचून सत्य समजू शकतील हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे असे मुक्ती मंजूर जियाई यांनी सांगितले, तसंच हे पुस्तक मुंबई या ठिकाणी प्रकाशन झाले असून, आज 01/07/2025 रोजी नासिक येथे मुक्ती मंझूर जियाई यांच्या नेतृत्वाखाली हे पथक दाखल झाले असून नाशिक मध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून वक्फ ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले यानंतर हे पथक जळगाव पुणे येथेही पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी रवाना होणार असून, जळगाव पुणे येथे प्रकाशन केले जाणार आहे…

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई