खासदार राजाभाऊ वाजेंच्या अथक प्रयत्नातून सिपेट साकारणार तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी खासदार वाजे यांची संभाजीनगर येथील सिपेटला भेट, जाणून घेतला प्रकल्पाच्या कामाचा आढावा…
नाशिक: नाशिकच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सिपेट CEPT (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग) प्रकल्प नाशिकमध्ये लवकरच सुरू व्हावा यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागील एक वर्षभर जोरदार पाठपुरावा केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून खासदार वाजे यांनी नुकतीच संभाजीनगर येथील सिपेट संस्थेला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान खासदार वाजे यांनी सिपेटचे कामकाज कसे चालते, याबाबतची सविस्तर माहिती घेतली. सिपेट नाशिकमध्ये सुरू झाल्यावर नाशिकच्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कसा फायदा होईल, तसेच प्लास्टिक उत्पादन संबंधित उद्योगांना याचा कसा लाभ मिळेल, याची त्यांनी पाहणी केली. सिपेट संस्थेचे प्रमुख आणि संचालक यांनी त्यांना प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सिपेट प्रकल्पासाठी जागा मिळवण्यावरून मतमतांतरे होती. हा विषय मार्गी लागावा यासाठी खासदार वाजे यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे सिपेटसाठी १० एकर जागा देण्याची घोषणा केली आहे.
सध्या या प्रकल्पाची फाईल महसूल मंत्रालयाकडून कौशल्य विकास मंत्रालयात आली आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी देखील खासदार वाजे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून लवकरच सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन प्रकल्प उभारणीला सुरवात होण्याची आशा आहे.
नाशिकमध्ये सिपेट इन्स्टिट्यूटची लवकर स्थापना व्हावी यासाठी खासदार वाजे लवकरच केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. याआधीही त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय सचिव श्रीमती निवेदिता शुक्ला यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
या प्रकल्पामुळे नाशिकमधील तरुण पिढीला प्लास्टिक निर्मितीचे आधुनिक शिक्षण मिळेल आणि स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली.
खासदार झाल्यापासून या प्रकल्पासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा प्रकल्प नाशिकच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.असे खासदार राजाभाऊ(पराग) प्रकाश वाजे नाशिक लोकसभा यांनी सांगितले.
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





