प्रतिनिधी नाशिक:- सर्व रेशन धान्य वितरणात बायोमेट्रीक मशिनवर थंब घेऊन ग्राहकांना धान्य वितरीत होत असल्याने आता बऱ्यापैकी पारदर्शकता आली आहे. असे असले तरी रेशन दुकानदारांच्या कारभाराबाबत सतत तक्रारी होतात. जिल्हा पुरवठा विभागातर्फे जानेवारी ते मे या कालावधीत रेशन दुकानांची नियमित तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ३९० दुकानांना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहाणी केली. या पहाणीत ८३ दुकानांच्या कारभारात अनियमितता आढळून आली.
- https://youtu.be/7x4WQdtFbU0?si=hY0wHZWnaDmGRS-i
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची आहे. धान्याचे रजिस्टर अपडेट न ठेवणे, लाभार्थीना वेळेत धान्य न मिळणे, दुकान बंद असणे यासारख्या बाबी निदर्शनास आल्या. सूचना करूनही संबंधित दुकानदारांकडून ई-केवायसी नोंदणीला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
या मधे निफाड १५, धान्य वितरण अधिकारी नाशिक १३, नाशिक ११, नांदगाव ८, चांदवड ७, दिंडोरी ५, मालेगाव ४, बागलाण ४, कळवण ३, इगतपुरी ३ अशा एकूण ७३ रेशन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची आहे. दुकानांची नियमित तपासणी सुरूच राहणार असून, दोषी दुकानदारांवर परवाना रद्द सारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते.असे कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी,यांनी सांगितले.
रेशनच्या धान्य वितरणातील अनियमितता, लाभार्थीना हक्काचे धान्य देण्यात होणारी टाळाटाळ, दुकान सतत बंद ठेऊन ग्राहकांना वेठीस धरणे अशा एक ना अनेक तक्रारी असणाऱ्या जिल्ह्यातील सहा रेशन दुकानदारांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केले आहेत. याशिवाय ई-केवायसी नोंदणीत हलगर्जीपणा करणाऱ्या ७३ रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाने दंड ठोठावला आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





