best news portal development company in india

चक्क घरात बिबट्या शिवडे तालुका सिन्नर येथे घटना, वन विभाग अधिकारी कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले….

SHARE:

 नाशिक जिल्ह्यातील तालुका सिन्नर येथील शिवडे गावात राहणाऱ्या महिलांना रात्री बिबट्या आल्याचा संशय आला कारण या परिसरात मागील काही दिवसांपूर्वी बिबट्या काही नागरिकांच्या निदर्शनास आला होता. म्हणून पुरुषांनी खात्री करण्यासाठी बॅटरी लावून बघितले असता चक्क बिबट्या निदर्शनात आला.

 प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर   

   सिन्नर:-सिन्नर तालुक्यातील शिवडे या गावी दिनांक 21/ 6/ 2025 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास शिवडे रहिवासी श्री.विलास राजाराम हरक यांच्या घराजवळी पडवीत बिबट्या एका कुत्र्याच्या मागे लागल्याने बिबट्या पडवीत गेला म्हणून घरमालकाने दरवाजा लावून घेतला. त्यामुळे बिबट्या पडवीत अडकला अशी बातमी संपूर्ण परिसरात पसरली व लगेचच वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी संपर्क केला. व तात्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अधिकारी बिबट्या असलेल्या स्थळी हजर होऊन रात्रीच्या वेळेस साडेतीन चार तासपर्यंत बिबट्या जेरबंद करण्याचा प्रयत्न केला.या अथक प्रयत्नानंतर बिबट्या अखेर पहाटे साडेतीन ते चार वाजता जेरबंद करण्यात आला.

 

 बिबट्या नर असून बिबट्याचे अंदाजे वय वर्ष चार असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 या वेळी माननीय उपवनसंरक्षक पश्चिम विभाग नाशिक श्री सावर्डेकर साहेब, माननीय सहाय्यक वन संरक्षक श्री. खैरनार साहेब, माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर श्री पारेकर साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम यांच्या समवेत श्री एस.आर.शिंदे साहेब,वन परिमंडळ अधिकारी श्रीमती शितल तांबे, वन संरक्षक शिवडे श्री निलेश निकम, वनसंरक्षक कर्मचारी श्री बाबुराव सदगीर,श्री रमेश आवटे, श्री रोहित लोणार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभाग अधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्या नर सुरक्षित जेरबंद करण्यात आला..

 प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई