लासलगाव प्रतिनिधी –
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) लासलगाव शाखा व एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी व निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शाखा कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली.
बँकेतून कर्ज घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून आरोग्य विम्यासाठी रक्कम कापली गेली, मात्र चार वर्ष उलटूनही विमा उतरवलेला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. २०२२ मध्ये SBIG आरोग्य प्लस विमा पॉलिसीसाठी ऑनलाईन रक्कम कपात झाली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खातेदारांना आरोग्य विम्याचे फायदे समजावून सांगितले होते, मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष विमा उतरवण्यात कंपनी अपयशी ठरली.
पीडित खातेदारांनी वारंवार बँक व इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधूनही २०२५ पर्यंतही पॉलिसी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित तातडीच्या परिस्थितीत विम्याअभावी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बँक व विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी व ग्राहक संभ्रमात असून आर्थिक संकटात सापडले आहेत.
नावाजलेल्या बँकेच्या शाखेमध्ये जर ग्राहकांशी असा गैरव्यवहार होत असेल, तर सामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. इन्शुरन्स कंपनीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून पैसे जमा असूनही पॉलिसी न मिळाल्यामुळे हा प्रकार मोठ्या गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतो.
या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू झाले असून, खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलकांशी संपर्क साधून वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी स.पो.नि. भास्करराव शिंदे, माजी सभापती शिवा सुरासे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे, डॉ. विकास चांदर, सामाजिक कार्यकर्ते केशवभाऊ जाधव, माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब बोचरे,राजाराम मेमाणे,संतोषशेठ हुजबंध,धनंजय जोशी,योगेश कुलथे, संपतराव अधांगळे , डॉ. विकास चांदर,उमेश कुलथे,राजेंद्र मेमाणे,राजेंद्र कांबळे,सचिन बोचरे, रेवणसिद्ध लोहारकर, रामा बोचरे, संतोष पानगव्हाणे यांच्यासह इतर मान्यवरांनी आंदोलन स्थळाला भेट दिली.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......









