मेंडपाळांच्या बिराडासहित बच्चु कडुंच्या अन्न त्याग उपोषणाला पाठिंब्यासाठी सर्व पक्षियांनी गुजरात हायवे केला बंद मेंढापाळाचे प्रश्न मार्गी लावा नाहीतर गुजरात हावे कायमच रोखू…समाधान बागल 
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तसेच राज्याचे माजीमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी 8 तारखेपासून अन्न त्याग आंदोलन सुरु केलेले असुन त्यावर शासनाकडून कुठलाही तोडगा आतापर्यंत काढला गेला नाही. याचीच झळ आता राज्यातील इतर ठिकाणी बघावयास मिळत आहे,

काल आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या भावणा सरकार पर्यंत पोचवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे समाधान बागल यांच्या नेतृत्वात मेढापाल , दिव्यांग , शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी गुजरात हायवे जाम करुन शासनास जाग आणण्यासाठी प्रयत्न केले भर रस्त्यावरच गुजरात नॅशनल हवे तब्बल तीन तास रोखून धरला व आंदोलक रस्ता चक्का जाम करण्यावर ठाम राहीले पोलीस प्रशासनाने परिस्थिती ची गंभिरता लक्षात घेऊन आंदोलकांची धरपकड केली तसेच आंदोलकांना ताब्यात घेतली व आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु सरकारला जाग आल्याशिवाय ह्या शेतकरी आंदोलनाची आग शांत होनार नाही जर हे निगरगट्ठ सरकार असेच वागत राहीले तर ह्याचे परीणाम सरकारला शेतकरी भोगायला लावतील ,
जो एका दाण्याचे शंभर दाने करु शकतो तोच शेतकरी वेळ आल्यावर सरकारचे कंबरही मोडु शकतो असा इशारा उपस्थितांचे वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस समाधान बागल यांनी दिला. याप्रसंगीबागलांचे तालुकाध्यक्ष गणेश काकूळते, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले आंदोलनासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते..
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





