समाधान बागल यांची गेली चार-पाच वर्षाचा सामाजिक कार्याची भरारी ,….
प्रतिनिधी चांदवड:-आजकाल तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड लागल्याशिवाय अत्युत्तम अशी कामगिरी तुमच्या हातून घडूनच येत नाही हा अनुभव आहे,मग ते कुठलेही क्षेत्र असो.
नाशिक पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्रात असेच एक झपाटलेले व्यक्तीमत्व म्हणजे नाशिक येथील श्री.समाधान बागल.
आठराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा भगवा झेंडा होळकर घराण्याने उत्तर हिंदुस्थानात ठिकठिकाणी फडकवला. एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानातील पठाणाच्या ताब्यातील अवघे पाकिस्तान जिंकून पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटकेच्या पारही स्वराज्याचा भगवा फडकवला. त्याचबरोबर स्वतःच्या होळकरशाहीचाही श्रीमंत मल्हारराव होळकरांनी पाया रचिला. तर लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी कळस रचिला. माळव्यात होळकर शाही बहरलेली असतानाच दख्खनेतही आपले एखादे मजबूत ठाणे असावे की जे उत्तरेला आणि दक्षिणेला जोडून ठेवील असे होळकरांना वाटत होते. म्हणूनच श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी दिल्ली बादशहाकडून असे मोक्याचे ठाणे चांदवड ताब्यात घेतले. होळकरांच्या रूपाने मराठ्यांचा आणि चांदवडचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. परंतु हा इतिहास काळाच्या ओघात पुसला जातो की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र याचवेळी एक तीस-पस्तीशीतील तरुण पुढे आला आणि त्याने आपल्या काही समविचारी युवकांना बरोबर घेऊन चांदवड येथील होळकर राजवाड्यात एकापेक्षा एक ऐतिहासिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. आणि सर्व महाराष्ट्राचे लक्ष ऐतिहासिक चांदवड नगरीकडे वळवले.नाशिक जिल्ह्यात होळकरशाहीच्या पाऊलखुणा जिवंत ठेवत या युवकाने दैदिप्यमान इतिहास जनतेसमोर ठेवण्याचे काम केले. हा होळकर इतिहास वेडा युवक म्हणजेच समाधान बागल.होळकरशाहीचे संस्थापक शूर,पराक्रमी असलेले श्रीमंत मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास सर्व जनतेसमोर आणण्यासाठी समाधानजी रात्रीचा दिवस करीत आहेत.
नाशिक जिल्ह्यात पु.अहिल्या जयंती गावागावात व घरोघरी साजरा करण्याचे श्रेय श्री.समाधा बागल यांना जाते.अहिल्यादेवींच्या जन्म त्रिशताब्दी वर्षात तिनशे ग्रामपंचायतींना अहिल्यादेवींची मुर्ती भेट देण्याचा संकल्प करून तो अंमलात आणला . आपल्या पगारातील चार आणे हिस्सा समाजकार्यासाठी खर्च करणारा हा अवलिया.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड म्हणजे प्रती चौढी किंवा प्रती इंदूर.पु.अहिल्यादेवींच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेली ही होळकरांची महेश्वर नंतरची उपराजधानी लौकिक दृष्टीने मागे पडली होती.समाधानजी मागील तिन चार वर्षांपासून तेथे मल्हार उत्सव भरवतात , होळकर वाड्यावर(रंगमहाल) रोशनाई करतात,इतिहासकारांचे व्याख्याने आयोजित करतात, मराठेशाहीतील सरदारांच्या वारसदारांचा सन्मान करतात,दिव्यांगांचा सन्मान करुन त्यांना ट्रायसिकल चे वाटप करतात. अहिल्यादेवींनी बसवलेल्या चांदवड गावातच त्यांचा पुतळा नसावा ही गोष्ट समाधानजी यांच्या मनाला लागणारी ठरली व शासकीय दरबारी पाठपुरावा करुन चांदवड येथे अहिल्यादेवींचे स्मारक व पुतळा व्हावा या करीता पायपीट करत असतात.रंगमहालाच्या नुतनीकरणासाठी पाच कोटी चा निधी सरकार कडून मिळवण्यासाठी राजकारण्यांचे दरवाजे ठोठावतात.नाशिक जिल्ह्यात पु.अहिल्यादेवींनी बांधलेल्या अनेक विहिरी आहेत ,या विहिरींचा शोध घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी लोकजागृती करण्याचे काम त्यांचे अखंड चालू असते.नाशिक जिल्ह्यात तुकोजी होळकर (द्वितीय) यांचे जन्मगाव आहे तेथे दरवर्षी तिन में रोजी तुकोजी होळकर जयंती साजरी करतात.नाशिक येथे गोदावरी तिरावर पु.अहिल्यादेवी होळकर यांनी घाट बांधला आहे, काशी विश्वेश्वर मंदिर व अहिल्या राम मंदिर बांधले आहे.दरवर्षी ३१मे रोजी श्री.समाधानजी बागल यांच्या प्रयत्नांतून तेथे संध्याकाळी काशीच्या धर्तीवर गोदा आरती व अहिल्या आरती करण्यात येते.श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अहिल्यादेवींनी ईतिहास प्रसिद्ध कुशावर्त बांधले आहे.दरवर्षी अहिल्यादेवी पुण्यतिथीला या त्र्यंबक नगरीत अहिल्यादेवींची पालखी काढून कुशावर्तावर आरती करण्याचा पायंडा श्री.समाधाजी बागल यांनी पाडला.अहिल्यादेवींच्या जन्म त्रिशताब्दी वर्षात चांदवड या होळकरांच्या उपराजधानीत सहावे धनगर साहित्य संमेलन व्हावे अशी समाधान जी बागल यांची इच्छा होती व त्या अनुषंगाने ११मे रोजी साहित्य संमेलन टिमचा चांदवड दौरा व नियोजन बैठक चांदवड येथे होउन सहावे धनगर साहित्य संमेलन चांदवड येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला व याच्या आयोजनाची जबाबदारी श्री.समाधानजी बागल यांच्याकडे देण्यात आली.या माणसाने मागील वर्षाच्या चांदवड येथील होळकर महोत्सवासाठी घरचा दागिना गहाण ठेवण्याचा जयंती सोहळे पार पडले त्यांच्या मित्रमंडळीला माहित आहे.आपले पारदर्शक कामकाज व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धती मुळे समाजमनावर त्यांनी गारुड केले आहे.अशा झपाटलेल्या माणसांमुळेच ईतिहास जागृत होतो,चळवळी जिवंत राहतात व सर्व समाज एकत्र येत असतो. शब्दांकन:- लक्ष्मण नजान सर,होळकर शाही व्याख्याते
श्री.विनयजी काळदाते =धर्मपीठ कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य,
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






